तुमच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आहे?

 तुमच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आहे? मग मनपाच्या ‘या’ मोबाईल क्रमांकावर तक्रार करा
नगर : नगर शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेवून महानगरपालिकेने अखेर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलली आहेत. महानगरपालिकेने याबाबत पत्रक प्रसिध्दीस देवून नागरिकांना तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेने मोकाट कुत्रे पकडून निर्बीजीकरण, लसीकरण, औषधोपचार करण्यासाठी पुण्यातील एका खासगी संस्थेची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता नागरिकांनाही आपल्या भागात कुत्र्यांची समस्या असल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे

पी.व्ही.रामदिन (मो.9561004669), एस.एम.भोसले (मो.7385084545), व्हि.व्ही.माने (मो.8208331180).


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post