स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपच्या मनोज कोतकरांचा राष्ट्रवादीकडून अर्ज

 स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपच्या मनोज कोतकरांचा राष्ट्रवादीकडून अर्ज

नगर : नगर महानगरपालिकेत स्थायी समिती सभापती निवडीवरुन राजकीय शह काटशह सुरु झाला असून सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठी खेळी करीत भाजपच्या मनोज कोतकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांचा अर्ज दाखल केला आहे. भाजपशी थेट हातमिळवणी टाळण्यासाठी राष्ट्रवादीने ही खेळी केल्याची चर्चा असून आ.संग्राम जगताप यांचे समर्थक असलेले मनोज कोतकर हे मनपा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर विजयी झालेले आहेत. मात्र सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. नगरमध्ये भाजपशी थेट आघाडी केली तर राज्यात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीने मनोज कोतकर यांच्या हातात घड्याळ बांधून त्यांना सभापतीपदाची संधी दिली. हे करताना राष्ट्रवादीने आता शिवसेनेसमोरही पेच निर्माण केला आहे. 

शिवसेनेकडून नगरसेवक योगीराज गाडे यांचाही अर्ज दाखल
दरम्यान शिवसेनेनेही स्थायी समिती सभापतीपदाच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी नगरसेवक योगीराज गाडे यांनी आपला अर्ज दाखल केला. नगरमधील या राजकीय हालचालींमुळे उद्या होणारी सभापती निवड रंगतदार होण्याची शक्यता आहे. भाजप आता कोणती भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post