पञकार रायकर यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नेवासा तालूका पञकार एकता संघाची मागणी

 पञकार रायकर यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नेवासा तालूका पञकार एकता संघाची मागणी ! 




नेवासा, -पुणे येथील टिव्ही ९ चे वरिष्ठ पञकार पांडूरंग रायकर यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्युस जबाबदार आसणाऱ्या व प्रशासनातील हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन रायकर कुटूबिंयांना त्वरीत शासकिय मदत करण्याची मागणी नेवासा तालूका पञकार एकता संघाच्यावतीने नेवासा तहसिलदार रुपेश कुमार सुराणा यांना एका निवेदनाव्दारे करण्यात आली.

   यावेळी नेवासा तहसिलदांराना दिलेल्या पञकार संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. रायकर यांना वैद्यकिय सेवा व सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचे दुर्देवी निधन झाले.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रायकर यांची प्रकृती खलावत आसतांना त्यांना वेळेत सेवा व सुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्देवी अंत झाला याला कारणीभुत आसणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन रायकर कुटूंबियांना तातडीने शासकिय मदत देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली.

     या निवेदनावर नेवासा तालूका एकता पञकार संघाचे अध्यक्ष संदिप गाडेकर,सुनिल गर्जे,राजेंद्र वाघमारे,मकरंद देशपांडे,बाळासाहेब नवगिरे,ज्ञानेश्वर जाधव,रमेश शिंदे,अदिनाथ म्हस्के,अशोक तुवर,पवन गरुड,कमलेश गायकवाड,उमाकांत भोगे आदींच्या सह्या आहेत.



कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लोकशाहीचा चौथ्था स्तंभ आसणारा पञकार कोरोनाच्या महामारीतही वृत्तसंकलन करण्यासाठी जीवाची पर्वा न करता पुढे जावून जनतेला घरबसल्या माहीती पुरवतो असतो.अशा वेळी पञकारच कोरोनाचा शिकार झाला सत्य बात्तम्या देत आसल्याने प्रशासनातील काही लोकांनी जाणिवपुर्वक रायकर यांना सुविधा दिलेल्या नसल्याची चर्चा आहे याची सखोल चौकशीही महाराष्ट्र शासनाने करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी नेवासा तालूका पञकार एकता संघाचे अध्यक्ष संदिप गाडेकर यांनी केली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post