आता 'एमएचटी-सीईटी' परीक्षेचेही नियोजन सुरु, ऑक्टोबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता

आता एमएचटी-सीईटी परीक्षेचेही नियोजन सुरु, ऑक्टोबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

नगर : केंद्रीय स्तरावरील इंजिनइरिंग, मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची जेईई, नीट प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये होत असताना महाराष्ट्रात सरकारने एमएचटी सीईटी परीक्षा घेण्याच्या हालचालीही सुरु केल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्टिटरवरुन याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग सीईटी सेल मार्फत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी) दिनांक  1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2020 दरम्यान घेण्याचा प्रयत्न आहे. याचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा, असे व्टिट सामंत यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post