‘मावा’ न दिल्याने ‘दोस्त दोस्त ना रहा’, मित्रावरच केले कोयत्याने वार

‘मावा’ न दिल्याने ‘दोस्त दोस्त ना रहा’, मित्रावरच केले कोयत्याने वार

सांगलीः तंबाखूची पिचकार मारत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्‍यांना आता दंड केला जात असला तरी मावा, तंबाखू खाणारे काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत. सांगली जिल्ह्यातील कुपवाडा येथे तर मावा न दिल्याने एका तरूणाने आपल्या मित्रावरच कोयत्याने वार केले. केतन किशोर यादव असे जखमीचे नाव आहे. याबाबत त्याने कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्याच्या फिर्यादीवरून शुभम कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड येथील अवधूत कॉलनीमध्ये राहणारा शुभम कांबळे यांने केतन यादव याच्याकडे मावा मागितला होता. मात्र, त्याने मावा देण्यास नकार दिला. तेव्हा रागाच्या भरात येऊन शुभम याने किशोर यादव याच्यावर कोयत्याने हल्ला चढवून त्याला जखमी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post