‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तू नाही’

 ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तू नाही’

‘या’ जिल्हाधिकार्‍यांच्या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुककोल्हापूर दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) :-  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेली ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ यासारख्या  अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जनजागृती मोहिमेचा गौरव केला.

पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कोल्हा्पूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे पालकसचिव सहभागी झाले होते.


जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची  व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापारी, दुकानदार  या ठिकाणी मोहिमेच्या प्रचारासाठी स्टिकर्स लावले जात आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या गावांमध्ये, प्रभागांमध्ये प्रबोधनाचे होर्डिग्ज लावत आहेत. दुकानदार दर्शनी भागात मोठ्या प्रमाणात फलक लावत आहेत. पब्लिक ॲड्रेस यंत्रणा, घंटा गाडी यावरुनही मोठ्या प्रमाणात मोहिमेची प्रचार प्रसिध्दी केली जात आहे.   जिल्ह्यातील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी विना मास्क खरेदी करु नये तसेच संबंधित दुकानदारानेही मास्क न लावल्यास त्याच्याकडूनही ग्राहकांनी खरेदी करु नये यासाठी ‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तू नाही’ असे फलक दुकानदार दर्शनी बाजूस स्वत:हून लावत आहेत.  त्याचबरोबर दुकानदाराने मास्क लावला नसेल तर ग्राहक त्याच्या दुकानात प्रवेश करणार नाहीत. अथवा वस्तू घेणार नाहीत या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुकानदारांने मास्क वापरला नसेल तर त्याचे दुकान आठ दिवसांसाठी सील करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post