मराठा आरक्षणाबाबत खा.संभाजीराजेंनी पंतप्रधानांना अवगत करावे

 मराठा आरक्षणाबाबत खा.संभाजीराजेंनी पंतप्रधानांना अवगत करावे

खा.सुजय विखेंसह भाजप खासदारांची मागणीनवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात भाजपच्या खासदारांनी खा.संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेवून सविस्तर चर्चा करीत निवेदन दिले. यावेळी मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती, त्यातील न्यायालयीन बाबी, सर्व घडामोडी व याविषयातील सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी खा.डॉ.सुजय विखे, खासदार उन्मेष पाटील, खा.रक्षाताई खडसे, खा. हीनाताई गावित, खा. प्रितमताई मुंडे, खा. भारतीताई पवार उपस्थित होत्या. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्वत: खा.संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत अवगत करावे तसेच लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती खासदारांनी केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post