राष्ट्रीय फुले ब्रिगेड अहमदनगर शहर जिल्हा महिला अध्यक्षपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती

 राष्ट्रीय फुले ब्रिगेड अहमदनगर शहर जिल्हा महिला अध्यक्षपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती.         अहमदनगर-- देशातील बहुजन समाजाचे मानसिक,आर्थिक, शैक्षणिक उन्नतीचे ध्येय ठेऊन  बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला दिशा दिली तीच विचारधारा घेऊन राष्ट्रीय फुले ब्रिगेड देशभर कार्यरत आहे महाराष्ट्रात राष्ट्रीय फुले ब्रिगेड सक्रिय असून सामाजिक कार्यासाठी  योगदान दिलेल्या महिलांकडे फुले ब्रिगेड लक्ष ठेवून आहे बहुजन महिलांचे संघटन करून महिलांचे मानसिक आर्थिक उन्नतीचे ध्येय समोर ठेवून राष्ट्रीय फुले ब्रिगेड अहमदनगर शहर जिल्हा महिला अध्यक्षपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष नामदेव भुजबळ व महिला प्रदेशाध्यक्षा दुर्गाताई भाटी यांनी केली आहे तसे  नियुक्तीचे पत्र मंगल भुजबळ यांना  देण्यात आले आहे.                                  मंगलताई  भुजबळ या  गेल्या 15 वर्षापासून सामाजिक व राजकीय  क्षेत्रात कार्यरत आहेत . महिलांचे विविध प्रश्‍न शासन दरबारी सोडवल्यामुळे व महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी योगदान दिलेले आहे .मजबूत  संघटन व सामाजिक विविध प्रश्न व्यवस्थित हाताळण्याच्या कौशल्यामुळे बहुजन समाजासाठी त्यांच्याकडे सक्षम बहुजन चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांच्या केलेल्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे "आदर्श युवती पुरस्कार" व "अहिल्यादेवी होळकर पुरस्कार" प्राप्त झालेले आहेत  तसेच राज्यस्तरीय  सामाजिक प्रतिष्ठानचे "सावित्रीबाई फुले" व "माँ जिजाऊ" हे पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेले आहेत. जाग्रुती संस्थेच्या माध्यमातून 50 बचत गट त्यांनी स्थापन करून बचतगट   चळवळीत योगदान दिले आहे.  "सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट "या शाळेच्या " पालक टीचर  असोसियेशन"च्या उपाध्यक्ष व सरचिटणीस या पदावर त्यांनी काम  केलेले आहे त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रकाश सैनी साहेब,प्रदेश चे पदाधिकारी, प्रदेश कार्यकारीनी  सदस्य  तसेच अहमदनगर  जिल्ह्यातील व शहरातील विविध सामाजिक संघटना , लोकप्रतिनिधी यांनी  त्यांचे  अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post