केडगाव प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकारांची कोविड चाचणी शिबीर

केडगाव प्रेस असोसिएशनतर्फे पत्रकारांची कोविड चाचणी शिबीर

सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याची अध्यक्ष समीर मन्यार यांनी दिली माहितीअहमदनगर :

केडगाव प्रेस क्लब आणि महापालिकेच्या केडगाव येथील नागरी आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ५ सप्टेंबर २०२०) पत्रकारांची कोविड १९ चाचणी शिबीर आणि औषध वाटप करण्यात आले. यावेळी सर्व पत्रकारांच्या करोना चाचण्या निगेटिव्ह आल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष समीर मन्यार यांनी दिली.


शिक्षक दिनिनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गिरीश दळवी यांच्या टीमने पत्रकारांना यावेळी होमिओपॅथिक औषधांचे वाटप करताना कोविड १९ आजारामध्ये घाबरून न जाता एकमेकांची काळजी घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, करोना विषाणूची बाधा झाल्यावर अजिबात घाबरून न जाता योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत. रोजचे काम करतानाही मास्क वापरण्यासह वैयक्तिक अंतर ठेवावे. काळजी घेऊन आपण करोना विषाणूला नक्कीच हरवू शकतो.

या शिबिरामध्ये प्रेस क्लबचे सचिव मुरलीधर तांबडे, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, माजी अध्यक्ष नितीन देशमुख, योगेश गुंड, मिलिंद बेंडाळे, संजय गाडीलकर, सचिन जगताप, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, गोरख शिंदे ,विक्रम लोखंडे, तुषार मरकड, अरुण नवथर, अनिल हिवाळे, रामदास बेंद्रे, रवींद्र देशपांडे, बबन मेहेत्रे, ओंकार देशपांडे सचिन  चोभे, नरेश रासकर अमित मन्यार  अन्वर मन्यार शुभम पाचारणे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. या शिबिराचे आयोजन करण्यामध्ये केडगाव आरोग्य केंद्राचे बाबासाहेब अडसुरे, सिस्टर जोशी, क्षीरसागर, दळवे, घुले, संगीता खामकर, दिपाली शिंदे, राहुल बोरसे, अमोत बोराटे, गणेश चंदिले आदींनी खूप सहकार्य केले. या शिबिरामध्ये पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या टेस्ट करण्यात आल्या. सर्वांनी केडगाव प्रेस असोसिएशन आणि अहमदनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याबद्दल आभार व्यक्त केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post