कृषिकन्या निलम घोंडगे हिचे शेतकर्‍यांसाठी आधुनिक शेतीची प्रात्यक्षिक

कृषिकन्या निलम घोंडगे हिचे शेतकर्‍यांसाठी आधुनिक शेतीची प्रात्यक्षिक

नगर : महात्मा फुले कृषी विदयापीठ संलग्न दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठाणच्या साईकृपा कृषी महाविदयालय घारगाव (ता.श्रीगोंदा) अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमामध्ये कृषिकन्या निलम सुनिल घोंडगे या विदयार्थीनीने शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेतीची प्रात्यक्षिके दिली. नगर तालुक्यातील जेऊर गावातील ग्रामस्थांना याचा लाभ मिळाला. यामध्ये घोंडगे हिने एकात्मिक तण नियंत्रण पद्धती, बहुपोषक अन्नद्रव्ये यांचा योग्य वापर, जनावरांचे आहार विषयक माहिती,फळवागांची लागवड कशी करावी,पिकांवरील किड व रोग नियंत्रण याविषयी प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आले. या उपक्रमासाठी साईकृपा कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.के. एच.निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा.ए.बी.जाधव, कार्यक्रम अधिकारी एस.एस.तागड व अन्य तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post