स्वराज्य कामगार संघटनेचा नवीन कामगार कायद्याला विरोध

स्वराज्य कामगार संघटनेचा नवीन कामगार कायद्याला विरोध

कामगार हा देशाच्या जडणघडणीमधला महत्त्वाचा घटक : योगेश गलांडे
नगर : केंद्र सरकारने देशामध्ये कामगार कायदा अंमलात आणण्यासाठी कुठल्याही कामगार संघटनेबरोबर बैठक न लावता व विचारात न घेता हे कामगारविरोधी धोरण सरकारने लादले आहे. हा कायदा कामगारांसाठी अहितकारक व धोकादायक धोरण आहे. यापुढे हे बील जरी पास झाले असले तरी कामगार वर्गामध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय उद्योजकांच्या फायद्याचा व कामगारांच्या तोट्याचा आहे. तेव्हा त्याचा विरोध म्हणून सर्व कामगार संघटना लढाई करण्यास तयार आहे. तरी केंद्र सरकारने याची दखल घ्यावी. अंमलात आणलेला कामगार कायदा परत घ्यावा. कामगार हा देशाच्या जडणघडणीमधला महत्त्वाचा घटक आहे. कामगारा शिवाय उद्योग क्षेत्राला भरारी येणार नाही. कामगारांचे हक्क व कामगारांची चळवळ मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनात कामगारविरोधी चुकीचा कायदा पारीत करुन मंजुर करून घेतला आहे. या चुकीच्या निर्णयामुळे कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. या कायद्यामुळे कामगारांचे हक्क हिसकावून घेतले जाणार आहे. तसेच कामगार
कायद्याची पायमल्ली होणार आहे. तरी केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये घेतलेले निर्णय मागे घेण्यात यावे, अशी मागणी स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी करणारे विधेयक परत घ्यावे,
यासाठी स्वराज्य कामगार संगटनेच्यावतीने निदर्शने करताना संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे, सुनील गायकवाड, स्वप्निल खराडे, भाऊ जाधव, विकास केकाण, अमोल उगले, कचेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post