मनपा हद्दीतील कल्याणरोडचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करावे : सचिन शिंदे

मनपा हद्दीतील कल्याणरोडचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करावे : सचिन शिंदे


नगर : कल्याण-नगर-विशाखपट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ आहे. हा रस्ता नगर शहरातून जात आहे. या रस्त्यावर सीना नदीचा अनेक वर्षांचा पूल आहे. तो नादुरुस्त आहे. या रस्त्यालगत शिवाजीनगर परिसर हा नगर शहराच्या अत्यंत जवळ असल्यामुळे येथे मोठी लोकवस्ती आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा रस्ता अरुद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात आहे, तरी या रस्त्याचे काम चारपदरी करण्यात यावे, दोन्ही बाजुंनी गटार करण्यात यावीत, तसेच गटार, फूटपाथ, डिवाईडर टाकून रस्त्याचे सुशोभिकरण करण्यात यावे. या रस्त्याचे काम सिमेंट काॉक्रीटने करावे, अशी मागणी राज्याचे जलसंपादन मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. तसेच सीना नदीवरील पुलाचे
कामही लवकरात लवकर करावे. हा रस्ता केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली आहे तरी या रस्त्याच्या विकास कामासाठी मोठा निधी प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करावा. या रस्त्याच्या विकास कामामुळे नगर शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल. तरी लवकरात लवकर या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post