वारकरी संप्रदायावर शोककळा... रामदास जाधव कैकाडी महाराजांचं कोरोनामुळे निधन

वारकरी संप्रदायावर शोककळा... रामदास जाधव कैकाडी महाराजांचं कोरोनामुळे निधन पंढरपूर- 25 सप्टेंबर: राज्यातील वारकऱ्यांच श्रद्धास्थान असलेल्य पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव (कैकाडी) (वय-77) यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. रामदास महाराज जाधव ( कैकाडी) यांना कोरोनाची लागण झाली होती. अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रामदास महाराज यांची प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

रामदास महाराज जाधव ( कैकाडी) हे मूळ मनमाडचे रहिवासी होते. वारकरी संप्रदायात ते मानाचे स्थान होते. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post