कर्जत उपकारागृहातील 28 कैदी करोनाबाधित
कर्जत (आशिष बोरा): कर्जत तालुक्यात न्यायालयीन कस्टडीत व पोलीस कस्टडीत असलेल्या 49 कैद्यांपैकी 28 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे. कर्जत येथे उपकारागृहामध्ये एकूण 49 ब़ंदिवान आहेत. यामध्ये 48 पुरुष एक महिला असून यापैकी न्यायालयीन कोठडीत 42 आरोपी आहेत. तर सात आरोपी पोलिस कस्टडीत आहेत. आज या सर्व आरोपींची कोरोनाची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. याबाबत तहसीलदारांना अहवाल पाठविला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली असून पुढील आदेशाप्रमाणे या बंदिवानांना कोठे ठेवायचे याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. कर्जत येथील कोठडीत कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याचे समजताच कर्जत नगरपंचायतीने हा सर्व परिसर औषध फवारणी करून जंतूनाशक करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचेसह नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते
Post a Comment