जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण

करोना प्रतिबंध उपाययोजनांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण

नगर : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असताना अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात नसून, मार्गदर्शक सुचनांचे पालन देखील होत नसल्याचा आरोप अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्पलॉईज युनियनने केला आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये बँकेचे कर्मचारी जीव मुठीत धरुन सेवा देत असून, त्यांच्यात एक प्रकारे असुरक्षित व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेऊन सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याची मागणीचे निवेदन युनियनचे कार्यकारी अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांना दिले आहे.
मार्च 2020 पासून संपूर्ण भारत देशामध्ये कोरोनाचे थैमान सुरु आहे. सध्या अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने याबाबत सावधगिरीचा उपाय म्हणून वेगवेगळ्या प्रणाली व मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. बँक प्रशासनाशी युनियनच्या पदाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने भेट घेऊन चर्चा केली होती. बँक प्रशासनाने देखील कर्मचार्‍यांच्या आरोग्याच्या दृष्टीने रकारी सूचना व मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या बँकेच्या कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असून, भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थेच्या दृष्टीने ही बाब योग्य नसल्याचे युनियनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.   
जिल्हा बँकेतील चार ते पाच कर्मचारी कोरोनामुळे मयत झाले असून, सध्या अकोले, श्रीगोंदा, नगर, संगमनेर व पारनेर येथील शाखेमधील अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्या शाखेमध्ये कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडतात त्यांना औषधोपचाराच्या कालावधीची कंटेनमेंट कालावधीची रजा घेतली जाते व नांवे टाकली जाते. ज्या शाखेमध्ये कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह सापडतात त्या शाखेमध्ये काळजी घेतली जात नाही व इतर कर्मचार्‍यांची सुरक्षितता पाहिली जात नाही. सर्व शाखा या सरकारी नियमानुसार निर्जंतुकीकरण होत नाहीत. शाखेमध्ये सेवकांसाठी ग्राहकांसाठी सॅनिटायझर लिक्विड व उपकरणे उपलब्ध करून दिली जात नाहीत. शाखेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मास्क व हॅन्ड ग्लोज पुरवले जात नाही. शासकीय आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नसून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बँकेचे प्रशासन प्रमुख म्हणून कर्मचार्‌यांची जबाबदारी असून देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा उतरविण्यात आले नसल्याचे अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्पलॉईज युनियनच्या वतीने निवेदनात म्हंटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post