साठवण बंधारे व जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलक्रांती - खा. डॉ सुजय विखे पाटील

साठवण बंधारे व जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलक्रांती - खा. डॉ सुजय विखे पाटील 
कर्जत ता.30,  तालुक्यातील साठवण बंधारे व जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून साठलेले पाणी शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे,या मुळे निश्चितच जलक्रांती होत हरितक्रांती होईल असे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी  केले. 

 तालुक्यातील तोरकडवाडी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या व पूर्ण क्षमतेने भरलेल्या साठवण बंधाऱ्यातील जलपूजन खासदार डॉ विखे पाटील यांचे हस्ते करण्यात आले या वेळी ते बोलत होते. 

  ते म्हणाले यावर्षी कर्जत तालुक्यातील सर्व भागात समाधानकारक पाऊस झाला आहे यामुळे साठवण बंधारे व जल युक्त शिवार योजनेतून झालेल्या कामात मोठ्या  प्रमाणावर पाणी साठले आहे  ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या पाणी साठयामुळे पाण्याची पातळी वाढली आहे.आगामी काळात जिथे गरज आहे तिथे मी खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशी ग्वाही मी देतो.

आज  खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी आज कर्जत तालुक्यातील जलालपुर, राक्षसवाडी, तोरकडवाडी, राशिन, कर्जत शहर, चांदे, घुमरी या गावांचा दौरा केला.तेथे त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधित अडचणी समजून घेतल्या तसेच काही अडचणींचे संबंधितांशी संपर्क करीत सोडविल्या.तसेच  राक्षसवाडी येथे त्यांचे हस्ते  कलशारोहन सोहळा पार पडला, कर्जत  शहरातील जिल्हा उपरुग्णालयात  स्वच्छ सर्व्हेक्षण कामाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हाउपाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर,तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, युवक नेते दादासाहेब सोनमाळी, रामदास हजारे, गणेश क्षीरसागर , प्रांत अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आदी उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post