सीमा सुरक्षा करणार्‍या भारतीय जवानांची माणुसकी...व्हिडिओ

सीमा सुरक्षा करणार्‍या भारतीय जवानांची माणुसकी...व्हिडिओ
नागरिकाचा मृतदेह 25 किलोमीटर खांद्यावर वाहून नातेवाईकांच्या ताब्यात दिला

देशाच्या सीमांचे रक्षण करणारे जवान सीमांचे रक्षण करतानाच सीमाभागातील भारतीयांसाठीही आधार ठरतात. उत्तराखंडमध्ये जवानांच्या संवेदनशीलतेचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्यात दुर्गम भागात एकाचा मृत्यु झाला. याठिकाणी तैनात असलेल्या भारत तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) जवानांनी तब्बल 25 किलोमीटरचे अंतर पायी चालून सदर व्यक्तीचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोहचवला. डोंगरदर्‍यातून वाट काढत तब्बल 8 तास जवानांनी हा मृतदेह स्वत:च्या खांद्यावरुन वाहून नेला. मानवता जपत कर्तव्य बजावणार्‍या या जवानांना प्रत्येक जण मनोमन सलाम करीत आहे.
व्हिडिओ0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post