माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करून जीवनात मनुष्य जीवाला धन्य बनवा--ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख

माऊलींच्या कर्मभूमीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती साजरी
माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करून जीवनात मनुष्य जीवाला धन्य बनवा--ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख


नेवासा प्रतिनिधी(गणेश मुळे) :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या वतीने ७३१ वी ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती भक्तीपूर्ण वातावरणात मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत व सामाजिक अंतराचे पालन करत साजरी करण्यात आली.विश्वाच्या कल्याणा साठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासे नगरीत रचलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जगाला ललालभूत ठरलेला मार्गदर्शक ग्रंथ असून माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करून जीवनात मनुष्य जीवाला धन्य बनवा असे आवाहन यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते माऊलींच्या स्पर्शाने पावन झालेल्या पैस खांबाची व ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पूजन"पुंडलिक वरदा हरी विठ्ठल,श्री ज्ञानदेव तुकाराम" चा जयघोष करत करण्यात आले.
यावेळी बोलताना हभप शिवाजी महाराज देशमुख म्हणाले की माऊलींनी ७३० वर्षांपूर्वी नेवासेनगरीच्या पुण्य भूमीत येऊन पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तर सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली.तिथी नुसार शके १२१२ ते आतापर्यंत ज्ञानेश्वरीला ७३० वर्षे पूर्ण झाले.आज आलेल्या भाद्रपद वद्य षष्ठीला संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केली कारण ज्ञानेश्वरी अगोदरच शुद्ध होती मात्र त्याकाळी छपाई नसल्याने एकमेकांकडून प्रत लिहून घेण्याची पद्धत होती त्यामुळे अनेक कानामात्रा वेलांटी चुकत गेल्या म्हणून भाद्रपद वद्य षष्ठीला ती शुद्ध झाली म्हणून ज्ञानेश्वरीची जयंती साजरी करत असल्याचे देशमुख महाराजांनी सांगितले.
यावेळी नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष सतीश पिंपळे,उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,कृष्णा पाटील खरड, नगरसेवक इंजिनीयर सुनीलराव वाघ,अँड. बापूसाहेब गायके,आशिष कावरे,मंदिर व्यवस्थापक भगवानराव सोनवणे,गोरख भराट,आप्पा महाराज होन,अंबादास भागवत गुरुजी,सौ.प्रयागाबाई भागवत, सौ.शांताताई खरड,संदीप आढाव,शंकरराव तनपुरे, आदित्य चव्हाण उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर शंकर नाबदे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post