ऊस तोडणी जलद होण्यासाठी हार्वेस्टर वापराला पाठबळ विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या मशिनचे पूजन

 ऊस तोडणी जलद होण्यासाठी हार्वेस्टर वापराला पाठबळ

विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या मशिनचे पूजनलोणी : ऊस तोडणीसाठी लागणारा विलंब कमी व्हावा यासाठी  पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना आणि प्रवरा सहकारी बॅंकेच्या सहकार्याने  आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यात आलेल्या पहील्या  हार्वेस्टर मशिनची विधीवत पूजा करण्यात आली.


आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री डॉ विखे पाटील कारखान्याने हार्वेस्टर घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकरी अथवा कंत्राटदारांना आ.राधाकृष्ण विखे पाटील ट्रक्स वाहतूक सोसायटीच्या पुढाकाराने प्रोत्साहनपर योजना तयार करण्यात आली होती. यामध्यमातून एकूण बारा इच्छुक व्यक्तीनी  हार्वेस्टर मशीन  प्रवरा सहकारी बँकेच्या सहकार्याने खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.यापैकी पहीले हार्वेस्टर मशिन  बाबासाहेब बोरसे यांच्याकडे  कंपनीने सुपूर्त  केले.


पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर या हार्वेस्टर मशिनची विधीवत पूजा करण्यात आली.याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू,ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदूशेठ राठी,प्रवरा सहकारी बॅंकेचे चेअरमन बाळासाहेब भवर,संचालक अशोक आहेर प्रभारी कार्यकारी संचालक अशोक पानगव्हाणे,कामगार संचालक पोपट वाणी,दिलीप कडू ऊस तोड मजूर सोसायटीचे मॅनेजर  एस बी गायकवाड सरोज परजणे ट्रक वाहतूक सोसायटीचे मॅनेजर जालिंदर खर्डे ओएस अधिकारी मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post