सोन्याच्या दरात मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण...50 हजारांच्या खाली आले दर

 सोन्याच्या दरात मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण...50 हजारांच्या खाली आले दरनवी दिल्ली: सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. ऑगस्टच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 6820 रुपयांची घसरण झाली. मार्चनंतरही सोन्याच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीसह पहिल्यांदाच सोनं प्रति तोळा 50 हजारांखाली आलं आहे. सध्या सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 380 आहे. तर, एमजीएक्सवर सोमवारी सकाळी 10.20च्या सुमारास ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचे दर 0.14 टक्क्‌यांनी म्हणजेच 69 रुपयांनी घसरत 49 हजार 600 . याशिवाय, एमसीएक्सवर डिसेंबर वायदा बाजारात सोन्याचे दर सध्या 0.13 टक्क्‌यांनी म्हणजेच 63 रुपयांनी घसरत 49,585 झाले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post