आज नव्या १५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: ०१ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल

आज ६८१ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता साडेअठरा हजाराहून अधिक

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.८२ टक्के

आज नव्या १५२ बाधितांची रुग्णसंख्येत भर


अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ६८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.८२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १५२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७७३ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५९, संगमनेर ०१, पाथर्डी ०७, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०२, श्रीगोंदा २५, अकोले ०२, राहुरी ०५, शेवगाव १८, कोपरगाव ०९, जामखेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६८१ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २६९, संगमनेर ४५, राहाता ४७, पाथर्डी ०९, नगर ग्रा.४९, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा १३, श्रीगोंदा ४०, पारनेर १२, अकोले ५०, राहुरी २५, शेवगाव १८,  कोपरगाव २७, जामखेड २८, कर्जत ०४, मिलिटरी हॉस्पिटल ०४ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: १८५५७

उपचार सुरू असलेले रूग्ण:२७७३

मृत्यू: २९४

एकूण रूग्ण संख्या:२१६२४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post