सरपंच परिषदेच्या याचिकेवर 12 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

 सरपंच परिषदेच्या याचिकेवर 12 ऑक्टोबरला पुढील सुनावणीमुंबई : ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत मुंबई हायकोर्टाने राज्यातून आलेल्या इतर याचिकांवर क्लोज फॉर ऑर्डर केली असून निर्णय राखून ठेवला आहे. सरपंच पारिषद मुंबई महाराष्ट्रने मूळ याचिकेत अमेंडमेन्ट केल्याने राज्य सरकारने केलेल्या कायद्याला आव्हान दिल्यामुळे एकमेव याचिका आता मुंबई कोर्टात कामकाजासाठी प्रलंबित आहे. सरपंच परिषदेच्यावतीने ऍड.नितीन गवारे यांनी बाजू मांडली असून मुंबई हायकोर्टाने पुढील 12 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. आज या सुनावणीकरिता औरंगाबाद येथील ऍड. नितीन गवारे यांच्या कार्यालयात ऑनलाईन सुनावणी करिता प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, उपाध्यक्ष अनिल गिते पाटील, प्रदेश सचिव विकास जाधव, नगर जिल्हाध्यक्ष आबा पाटील सोनावणे उपस्थित होते, अशी माहिती सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते पाटील यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post