काळ आला होता पण....पुरात वाहून जाणार्‍या तरूणाची सुखरुप सुटका...व्हिडिओ

 काळ आला होता पण....पुरात वाहून जाणार्‍या तरूणाची सुखरुप सुटका...व्हिडिओ

नेवासा तालुक्यातील शिरेगाव- खरवंडी रस्त्यावरील पुरात वाहून जाणार्‍या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवलं



नेवासा (गणेश मुळे): नेवासा तालुक्यातील शिरेगाव - खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना रविवारी (दि.21सप्टेंबर) दुपारी घडली. पुलावरून पाणी वाहत असतानाही तरुणाने आपल्या पत्नीला मोटारसायकलवरुन खाली उतरविले व स्वत : मोटारसायकल पाण्यात घातली. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. नदीत असलेल्या झाडाला अडकल्याने झाडाला पकडून तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पत्नीने आरडाओरड केल्याने शेजारील तुवर वस्तीवरील काही युवक पळत आले. त्यांनी तात्काळ दोरखंड आणले. दोरखंडाने तरुणास ओढून प्रवाहाबाहेर काढले.अर्धा तास हा चित्तथरारक प्रकार सुरु होता.

.व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post