अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा, घरुनच पेपर देण्यासाठी तीन पर्याय

अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार
घरुनच पेपर देण्यासाठी तीन पर्याय

मुंबई : राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यानुसार प्रयोगशाळेत जाऊन प्रॅक्टीकल करण्याऐवजी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. यात ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेंट बेस परीक्षा असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. विद्यापीठांना यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर परीक्षेबाबत अंतिम स्वरुप निश्चित करण्यात आलं आहे. कुलगुरुंची समिती परीक्षेबाबतचा आपला अहवाल आज सरकारकडे सादर करणार आहे. अकादमी कौन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर परीक्षा मंडळाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवावा लागेल.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, 15 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याचं नियोजन कुलगुरु करत आहेत. प्रॅक्टीकल परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लॅबमध्ये जावं लागू नाही, अशा सूचना केल्या होत्या. त्याचप्रकारे अहवाल सादर करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात निर्णय घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा, अशा पद्धतीच्या सूचना महाराष्ट्र सरकारच्यावतीने आम्ही कुलगुरुंना केल्या आहेत. कुलपती म्हणून राज्यपालांनीदेखील त्याच सूचना कुलगुरुंना केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post