मॉडेल पूनम पांडेची पतीविरोधात पोलिसांत तक्रार, लग्नानंतर अवघ्या 13 दिवसात प्रकरण घटस्फोटापर्यंत
मुंबई : मॉडेल पूनम पांडेने काही दिवसांपूर्वीच सॅम बॉम्बे याच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर अवघ्या 13 दिवसानंतर पूनम पांडेने तिचा नवरा सॅम बॉम्बे याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. हनिमूनसाठी गोव्याला गेलेल्या या जोडीमध्ये जोरदार भांडणे झाली. या दरम्यान पूनम पांडेने पती सॅमविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. आता तिने हे नाते तोडत, घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले आहे. पतीने आपला विनयभंग केल्याचा आरोप करत पूनम पांडेने सोमवारी रात्री पोलिसात तक्रार दाखल केली होती. गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची धमकी पतीने दिल्याचा दावाही तिने केला होता. वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंगळवारी संध्याकाळी गोवा कोर्टाने सॅम बॉम्बे याची सुटका केली. दक्षिण गोव्यातील कानाकोना गावात पूनम पांडे शूटिंग करत असलेल्या चित्रपटाच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. त्यानंतर पूनमची वैद्यकीय तपासणी होणार आहे. पतीला चार दिवस पोलिसात हजेरी लावावी लागणार असून या काळात त्याला तक्रारदार पत्नी पूनम पांडेशी संपर्क साधता येणार नाही.
Post a Comment