चार चाकीच्या विमा नूतनीकरणासाठी ‘फास्टॅग’ अत्यावश्यक


चार चाकीच्या विमा नूतनीकरणासाठी ‘फास्टॅग’ अत्यावश्यक

नवी दिल्ली : केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्गा मंत्रालयाने नुकताच एक आदेश जारी केला असून चारचाकी वाहनांचे विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित वाहनाला ’फास्टॅग’ असणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ’इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन’ (ईटीसी) ही प्रणाली 2016 मध्येच सुरू केली. डिसेंबर 2017 पासून नव्याने खरेदी केलेल्या वाहनांच्या नोंदणीसाठी ’फास्टॅग’ बंधनकारक केले. त्यानंतर टोल नाक्यावर रोख स्वरूपात पैशांची देवाण-घेवाण करताना वाहनांच्या लागणार्‍या रांगा कमी करण्यासाठी टोल नाक्यावर ’फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले. देशभरात  डिसेंबरपासून ’फास्टॅग’ची अंमलबजावणी केली जात आहे. ’फास्टॅग’ नसणार्‍या वाहनांसाठी टोलनाक्यांवर फक्त एकच मार्गिका राखीव ठेवण्यात येणार असून, अन्य मार्गिका ’फास्टॅग’धारक वाहनांसाठीच खुल्या ठेवल्या जात आहेत. ’फास्टॅग’ नसणार्‍या वाहनांनी या मार्गिकेत प्रवेश केल्यास त्यांना दुप्पट दंड आकारण्याची घोषणा करण्यात आली होती.  आता 1 एप्रिल 2021 पासून वाहनांच्या विमा नूतनीकरणासाठी ’फास्टॅग’ बंधनकारक करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post