100 रुपयात वर्षभरासाठी मद्यसेवनाचा परवाना, ‘या’ शहरात घरपोच मद्य सुविधाही उपलब्ध

100 रुपयात वर्षभरासाठी मद्यसेवनाचा परवाना, ‘या’ शहरात घरपोच मद्य सुविधाही उपलब्ध

 


मुंबई  : राज्यात १५ मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात येत आहे. काल दिवसभरात ४ हजार ५९० ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ४ हजार ३७७ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

 

मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 9,002 अनुज्ञप्ती सुरू  आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद  मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. राज्यात 15 मे 2020  पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री देण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल २०२०  ते 18 सप्टेंबर २०२० या काळात 1 लाख 56 हजार 085  ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी १ लाख 50 हजार 955 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.

 

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post