करोनाला रोखायचय? जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदींनी दिला हा मंत्र...

 


करोनाला रोखायचय? जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदींनी दिला हा मंत्र...नगर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना सर्वसामान्यांचीही तितकीच साथ मिळणे गरजेचे आहे. यादृष्टीने अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी नगरकरांना एक मंत्र दिला आहे. एक वचन तीन नियम या टॅगलाईनखाली मास्क वापरा, हात धुवा, अंतर राखा असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे. एक वचन तीन नियम हा मेसेज प्रत्येकाने किमान 50 कुटुंबापर्यंत पोहचवून त्यांचे आयुष्य वाचवायला मदत करावी व 50 कुटुंबांचे आशिर्वाद घ्यावेत, असा मजकूर जिल्हाधिकार्‍यांच्या पोस्टमध्ये आहे. सोशल मिडियावर या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी सदर मेसेजचा फोटो आपल्या सोशल मिडियाच्या स्टेटसवर ठेवला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post