प्रत्येक मानवाला आत्मसाक्षात्कार मिळविणे हा जन्मसिद्ध अधिकार -प. पु. माताजी श्री निर्मला देवी.

 प्रत्येक मानवाला आत्मसाक्षात्कार मिळविणे हा जन्मसिद्ध अधिकार -प. पु. माताजी श्री निर्मला देवी. महात्मा गांधी जयंती आणि शास्त्रीजी जयंती निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी भरता मध्ये प्रथमच १२ राष्ट्रीय भाषांमध्ये  सहजयोगाव्दारे कुंडलिनी जागृती  व आत्मसाक्षात्काराचा ऑनलाईन जाहीर कार्यक्रम नगर -  राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीजींच्या जन्मदिनी २ ऑक्टोबर २०२० रोजी भारताच्या १२ विविध क्षेत्रीय भाषांमध्ये सहजयोगाव्दारे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्काराच्या जाहीर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सहजयोग महाराष्ट्र समन्वयक - स्वप्नील धायडे यांनी दिली आहे 

     सहजयोगाच्या संस्थापिका परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कारा चा अनुभव प्राप्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, जो सर्वसामान्य जनतेसाठी विनामूल्य आहे. आपल्यात जन्मापासून आंतरिक  कुंडलिनी शक्तीच्या जागरणाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते आणि संतुलित जीवन शैली विकसित होते .या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शारीरिक-मानसिक विकास आणि अध्यात्मिक उन्नती आहे.

    परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या शिकवणीनुसार कुंडलिनी शक्ती मानवाचे अध्यात्मिक उत्थान आंतरिक संरक्षणाची मातृशक्ती आहे. जी प्रत्येक मानवात विराजमान आहे. फक्त आपलं संरक्षण व अध्यात्मिक उत्थान प्राप्त करण्यासाठी तिला जागृत करण्याची आवश्यकता आहे. मग ते कुठल्याही जाती,पंथ,धर्माचे, रंगाचे लोक असेना का? सर्वसामान्य जनांसाठी विनासायास कुंडलिनी जागृती प्रक्रिया १९७०  साली श्री माताजी निर्मला देवी यांनी सुरू केली. श्री माताजी यांनी वयाच्या सातव्या वर्षी महात्मा गांधीजींच्या आश्रमात गांधीजींच्या सानिध्यात  काही दिवस घालविले. श्री माताजीं चे संपूर्ण कुटुंब देशसेवेसाठी महात्मा गांधी जी सोबत कार्यरत होते.

 परमपूज्य श्री माताजी विश्वप्रसिद्ध अध्यात्मिक गुरु आहेत ज्यांनी मानवाला 'कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्काराचे ज्ञान' प्रदान केले आहे. सत्याला शोधणाऱ्या विश्वातील सर्व साधकांना हे ज्ञान आणि अनुभुती  विनामुल्य प्राप्त व्हावी यासाठी एक दिवसीय बहुभाषी आत्मसाक्षात्कार, कुंडलिनी जागरण व सहजयोग ध्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कुंडलिनी शक्तीची जागृती आणि आत्मसाक्षात्काराची आपल्या दैनिक ध्यान योग साधनेत मदत मिळते, त्याच्या परिणामस्वरूप आपली  रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आजारपण व नकारात्मक विचारांच्याप्रती प्रतिरोधक क्षमता वाढते.

      विश्वातील अनेक देशांनी श्री माताजींना नानाविध पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे आणि मानवाच्या आध्यात्मिक उत्थानात त्यांच्या योगदानाला मान्यता दिली आहे.गेल्या पन्नास वर्ष्यात संपूर्ण विश्वातील सर्व जातीधर्माच्या लाखों लोकांना सहजयोगाचे हे ज्ञान श्री माताजींनी विनामूल्य दिले आहे. सर्व धर्म व अध्यात्मिक परंपरेमध्ये आत्मसाक्षात्कार अंतिम लक्ष्य राहिले आहे. सर्व धर्माच्या ग्रंथांमध्ये याचे वेगवेगळे वर्णन केलेले आहे.

    सहजयोगींनी अनुभवले  आहे की साधकांमध्ये कुंडलिनी शक्तीच्या जागरणाने शारीरिक, मानसिक भावनात्मक आणि अध्यात्मिक प्रश्न सहज सोडवण्याची क्षमता आहे. ज्या साधकांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे, त्यांना त्यांच्या हाताच्या तळव्यावर आणि डोक्‍यावर थंड थंड चैतन्याची अनुभूती येते  आणि या प्रकारे वैज्ञानिक पद्धतीने साधकांनी आपल्या अंत:स्थित कुंडलिनी शक्तिच्या गतीला जाणिले आहे.

   सदर कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी 

सकाळी: ८ वा.संस्कृत,९ वा.हिंदी, १० वा. बंगाली, ११ वा.तेलगू

 दुपारी: १२ वा. तामिळ, १ वा. गुजराथी,२ वा.कन्नड, ३ वा.मल्याळम्, ४ वा.पंजाबी, सायंकाळी: ५ वा. मराठी,६ वा.ओडीशी, ७ वा.इंग्रजी.

   तरी सर्व साधकांनी आपआपल्या मातृभाषेत कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आणि दररोज learning sahajayoga या यूट्यूब चॅनेल वर सायंकाळी 5 वाजता लाईव्ह कार्यक्रमाद्वारे सहजयोग ध्यान विनामूल्य शिकण्याचे आवाहन सहजयोग जिल्हा समन्वयक - सुधीर सरोदे  यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post