नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘दूरदर्शन’वरुन शैक्षणिक मार्गदर्शन

 नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘दूरदर्शन’वरुन शैक्षणिक मार्गदर्शनपुणे : करोनामुळे यंदा शाळा, महाविद्यालयांचे कामकाज प्रत्यक्षात सुरु झालेले नसून राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या सत्राच्या अखेरच्या टप्प्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. विद्या प्राधिकरणातर्फे  ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम होणार आहे. ऑनलाइन शिक्षणासाठीच्या साधनसुविधांची मर्यादा लक्षात घेऊन एकाच वेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दूरदर्शनचा वापर करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून करण्यात येत होता. त्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी मे महिन्यात केंद्रिय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दूरदर्शनवर वेळ मिळण्यासाठी पत्रही लिहिले होते. मात्र त्या वेळी दूरदर्शनवर कार्यक्रम सुरू झाले नाहीत. दरम्यान, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी टिलीमिली हा कार्यक्रम सुरू केला. आता ऑक्टोबरपासून दूरदर्शनवर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शनाचा कार्यक्रम सुरू होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post