अहमदनगर शहरातील दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचे वाटप करावे
नगर - शासनाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यातीलच अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटूंबियांना शिधापत्रिका वाटप करावे असे निवेदन आज जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी अभिजित वांढेकर यांना देण्यात आले .
अहमदनगर शहरातील दिव्यांग व्यक्तींचा प्राधान्य कुटूंब लाभ योजनेतून अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटूंबियांना रेशन देण्यात यावे असे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हा अध्यक्ष रत्नाकर ठाणगे , प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे , अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष बाबा शेख, चंद्रकांत वाघमारे , शेख सुलताना बाबा , बाळासाहेब गायकवाड , शेखर बोत्रे , आदि उपस्थित होते.
याप्रसंगी रत्नाकर ठाणगे म्हणाले, नगर तालुक्यातील तहसिल कार्यालयामार्फत दिव्यांगांना रेशन कार्ड वाटप केले त्याच धर्ती वर आपण अहमदनगर शहरांतील दिव्यांगा ना पिवळे रेशन कार्ड देऊन त्यांचा अंतोदय या योजनेत समावेश करावा. व अहमदनगर शहरांतील सर्व दिव्यांग व्यक्तींना याचा कसा फायदा होईल यासाठी प्रयत्न करावे . तसेच शासनाच्या विविध योजनांना लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी अपंग सेल लढा देत आहे. विविध प्रश्नही मार्गी लागत आहेत. आताही दिव्यांगाचा अंत्योदय योजनेत समावेश करुन त्यांना शिधापत्रिकेचे लवकरात लवकर वाटप करण्यात येईल , त्यासाठी अहमदनगर शहरातील दिव्यांगाचा सोशल डिस्टंन्स पाळून कॅम्प घेण्यात येईल असे पुरवठा निरीक्षक वांढेकर यांनी ग्वाही दिली .
Post a Comment