व्यायाम करतानाच दळणही करा... अनोखी ‘सायकल चक्की’..... व्हिडिओ

व्यायाम करतानाच दळणही करा... अनोखी ‘सायकल चक्की’..... व्हिडिओ

निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायामाचे महत्त्व नेहमीच सांगितले जाते. मात्र महिलांना खास व्यायामासाठी स्वतंत्र वेळ मिळतोच असे नाही. सध्या सोशल मिडियावर एका महिलेचा अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या महिलेने घरातच सायकल चक्की तयार केली असून याव्दारे घरातील गहू, ज्वारी, डाळीचे दळण करतानाच ती सायकलिंगचाही व्यायाम करताना दिसून येते. घरात सहज समावून घेण्यात येणारी ही सायकल चक्की व्यायाम तर करवून घेतेच शिवाय घरातील दळणही यातून निघते. महिलांना खास व्यायामासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. घरातील सर्वच सदस्य व्यायाम करता करता दळणाचेही काम करू शकतात.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post