गळीत हंगामाआधी कारखान्यातील सर्व अधिकारी,कर्मचार्‍यांची करोना चाचणी


गळीत हंगामाआधी कारखान्यातील सर्व अधिकारी,कर्मचार्‍यांची करोना चाचणी
डॉ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा निर्णय

नगर : करोना नियंत्रणासाठी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने आणखी एक पाउल पुढे टाकण्यात आले आहे. आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रवरानगर येथील डॉ विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील सर्व अधिकारी आणि  कर्मचार्‍यांची करोना चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.  पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनच्या सहकार्याने या टेस्ट करण्यात येणार आहे.प्रवरानगर येथे कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या कोव्हीड 19 टेस्ट सेंटरचे उद्घाटन आ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  अवघ्या काही दिवसात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सुरूवात होणार आहे.कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामाचे पुर्व नियोजन सध्या सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन तथा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी साखर कारखान्यातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची करोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला.  खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विखे पाटील रुग्णालयातील 10  डॉक्टर  आणि त्यांच्या सहकार्याची टिम यासाठी नेमण्यात आली आहे.रोज 150 ते 200 स्वॅब घेतले जाणार असून 10 सप्टेंबरपर्यत एकूण दिड हजार कामगारांच्या टेस्ट घेतल्या जाणार आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post