चॅलेंजच स्विकारयचे तर करोनाविरुध्द लढण्याचे स्विकारा...

 चॅलेंजच स्विकारयचे तर करोनाविरुध्द लढण्याचे स्विकारा...

सोशल मिडियावरील ‘कपल चॅलेंज’ ट्रेंडची उडतेय खिल्लीनगर - सोशल मिडियावर कधी कोणता ट्रेंड हिट होईल हे सांगता येत नाही. सध्या फेसबुकवर चॅलेंजसचा ट्रेंड चालू असून यात कपल चॅलेंज, सिंगल चॅलेंज असे ट्रेंड जोमात आहेत. कपल चॅलेंजसमध्ये आपल्या जीवनसाथीबरोबरचा फोटो नेटकरी अपलोड करीत आहेत. या फोटोला लाईक, कमेंटसही भरपूर येत असल्याने प्रत्येकाचीच वाल या फोटोने ओसंडून वाहत आहे. त्याचवेळी सोशल मिडियातच या कपल चॅलेंजसबाबत नकारात्मक सूरही उमटत आहे. चॅलेंजच स्विकारायचे तर करोना विरुध्द लढण्याचे स्विकारा, गरजूंना मदत करायचे स्विकारा असे आवाहन या पोस्टमधून करण्यात येत आहे. कपल चॅलेंजवरुन अनेक विनोदी कमेंटही करण्यात येत असून एकमेकांच्या बायकांचे चेहरे पाहण्यासाठी कुणाच्या तरी सुपिक डोक्यातून हा ट्रेंड तयार करण्यात आल्याचा टोलाही लगावण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post