देशातील प्रमुख बँकांमध्ये लिपीक भरती प्रक्रिया,ऑनलाईन अर्ज मागवले

देशातील प्रमुख बँकांमध्ये लिपीक भरती प्रक्रिया,ऑनलाईन अर्ज मागवले

देशभरातील प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांनी लिपीक भरतीसाठी दारे उघडली असून करोनाकाळात नोकरीच्या शोधात असलेल्यांना या भरतीमुळे मोठी संधी उपलब्ध होणार आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने प्रमुख बँकांमधील क्लर्क पदासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे.  2 सप्टेंबर रोजी आयबीपीएसने लिपीक  भरती साठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत.

पुढील बँकांमध्ये होणार भरती -

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
कॅनरा बँक (Canara Bank)
इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank)
यूको बँक (UCO Bank)
बँक ऑफ इंडिया (Bank of India)
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India)
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)
यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)
बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra)
इंडियन बँक (Indian Bank)
पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sindh Bank)

ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात - २ सप्टेंबर २०२०
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत - २३ सप्टेंबर २०२०
अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत २३ सप्टेंबर २०२०
अर्जाची प्रिंट आऊट घेण्याची अंतिम मुदत - २३ सप्टेंबर २०२०
ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत - २३ सप्टेंबर २०२०


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
https://www.ibps.in/

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post