आयुक्त व महापौर यांच्या ढिसाळ कारभारा मुळे बाळासाहेब देशपांडे मध्ये बाळंतपणा साठी लगतो हजारो रुपये खर्च

 आयुक्त व महापौर यांच्या ढिसाळ कारभारा मुळे बाळासाहेब देशपांडे मध्ये बाळंतपणा साठी  लगतो हजारो रुपये खर्च 

शहरातील68 नगरसेवकांनी सांगावेआता आम्ही कोणाला काळे फासु मनसे च्या नितीन भुतारे यांचा सवाल




नगर शहरातील बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मध्ये गरोदर मातांना बाळंतपणा साठी 3000 ते 5000 रुपये खर्च येत आहे. शहरातील गोरगरीब सर्व सामान्य जनतेला मोफत सेवा मिळावी या करीता बर्शीकरांनी या हॉस्पिटल ची निर्मिती केली परंतु आज याच हॉस्पिटल ची परिस्थिती नाजुक बनली असुन  काही बाळंतपणा साठी खर्च करून काही बाळंतीन महिलांच्या नातेवाईकांनी मनसेचे  नितीन   भुतारे यांच्यकडे तक्रार केली त्यामुळे मनसे च्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल ची सर्व परिस्थिती मांडण्यात आली.

बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मध्ये लॅबॉरेटरी बंध आहे. रक्त पेढी बंध आहे. तसेच हॉस्पिटल मध्ये औषध पुरवठा होत नसल्यामुळे तेथील रुग्णांच्या नतेवाईकांना पैसे खर्च करुन बाहेरुन मेडिकल मधुन औषधे आणावे लागतात दर महिन्याला जवळपास 300 ते 350 गरोदर महिला बाळंतपणा साठी या ठिकानी येतात व या सर्व सिस्टम बंध असल्यामूळे रक्त,लघवी तपासणी लॅबॉरेटरी बंध असल्यामुळे खाजगी लॅब मध्ये तपासणी करवी लागते. त्याचा खर्च 1000 ते 2000 हजार रुपये येतो  अचानक रक्त लगले तर दुसरीकडे खाजगी रक्त पिढीतुन खर्च करुन रक्त घ्यावे लागते त्यामुळे नाहक गोरगरीब जनतेला हजारो रुपये खर्च करावे लागतात. 

बाळंतपणात शिजर साठी भूलतज्ञ महानगरपालिकेकडे नसल्यामुळे रात्री अपरात्री गरोदर मतांना खाजगी हॉस्पिटल मध्ये जावे लागते. तसेच पांढरी कावीळ, H I V रुग्णांना बाळंतपणा साठी पुणे येथील ससुन रुग्णालयात हलवावे लागते.

एम आर आय मशीन सारखीच परीस्थिती रक्त पिढीतील मशीनची झाली असुन सर्व टेक्निशियन असतांना 2016 साली 1 करोड रुपये खर्च करुन खरेदी केलीली मशीन आज बंध आहे.ह्या सर्व समस्ये मुळे गरीब लोकांवर नाहक खर्च करण्याची वेळ येते हे आयुक्तांच्या निदर्शनास मनसेचे जिल्हाध्यक्ष्य सचिन डफळ व मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी निदर्शनास आणुन दिले.

अनेक वेळा महापौरांनी बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलला भेट दिली परंतु त्यात सुदारना होण्या पेक्षा बाळासाहेब देशपांडे ची परस्थिती गंभीर व बिकट होत चालली असुन या सर्व प्रश्नावर आज पर्यंत एकही नगरसेवक बोललेला नाही. अनेक महिला नगरसेवक असुन एकही महिला नगरसेवकांनी बाळंतपणा साठी येनारया अडचणी कडे प्रशासनाचे लक्ष वेधले नाही. यामुळे या गोरगरीब सर्व सामान्य जनतेला वाली राहिलेले नसुन या सर्व  प्रकरणला आयुक्त व महापौर जबाबदार आहेत.  यांच्यासह अहमदनगर  महानगरपालिकेतील 68 नगरसेवकांच्या यांचा ढिसाळ कारभार जबाबदार आहेत. त्यामुळे आता आम्ही कोणाच्या तोंडाला काळे फासू असा सवाल  मनसेच्या वतीने नितीन भुतारे यानी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post