महामार्गांची तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासू

 


महामार्गांची तातडीने दुरुस्ती करा, अन्यथा अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासू

महापौर बाबासाहेब वाकळे यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारानगर : नगर शहरातून जाणार्‍या महामार्गांची प्रचंड दुरवस्था झालेली असून कल्याण रोड मोठ्या खड्डयांमुळे वाहतूक योग्य राहिलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आपल्या अखत्यारितील महामार्गांची डागडुजी करावी अन्यथा अधिकार्‍यांना काळे फासण्याचा इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना महापौर वाकळे यांनी पत्र पाठवले आहे.

या पत्रात महापौर वाकळे यांनी म्हटले आहे की, अहमदनगर शहरातून जाणा-या मनमाड ,पुणे, औरंगाबाद, सोलापूर , कल्याण या  महामार्गावरून मोठया प्रमाणात वाहनांची ये जा होत असते. सदरचे महामार्ग हे शहरातून जात असल्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. या चारही महामार्गावरील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. कल्याण मार्गे शहरातून जाणारा उड्डानपुलापासून नेप्ती नाक्यापर्यत रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर मोठ मोठ खड्डे पडलेले आहेत. या भागामध्ये मोठी लोकवस्ती आहे त्यामुळे शहरामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे रस्ते तातडीने दुरूस्त होणे आवश्यक आहे. सदर रस्ते अनेक दिवसा पासून खराब झालेले असून देखील आपण व आपल्या अखत्यारीतील अधिका-यांनी याबाबत कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. आपण व आपले अधिकारी नागरिकांच्या  जिवाशी खेळण्याचा प्रयत्न करित आहे. शहरातील नागरिक रोज आमच्याकडे फोनद्वारे, निवेदनाद्वारे रस्ते दुरूस्ती करणे बाबत तक्रारी करित आहेत.  त्यामुळे सदरचे रस्ते दहा ते पंधरा दिवसामध्ये दुरूस्त करण्यात यावे. अन्यथा आपल्याला कार्यालयामध्ये बसून देणार नाही व कोणत्याही क्षणी काळे फासण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post