पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची भाजपकडून केंद्रीय संघटनेत संधी

 पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची भाजपकडून केंद्रीय संघटनेत संधी

महाराष्ट्रातील चौघांची राष्ट्रीय मंत्रीपदी नियुक्तीनवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून महाराष्ट्रातून माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनिल देवधर, विजया रहाटकर यांची राष्ट्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील जमाल सिद्दीकी यांची वर्णी लागली आहे.

राज्यातून माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना थेट राष्ट्रीयपातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या विधानसभेच्या मागील निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. तेव्हापासून पक्षाकडून त्यांना केंद्रात संधी मिळण्याची चर्चा होती. विनोद तावडे यांनाही पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेली नव्हती. आता त्यांना राष्ट्रीय स्तरावर संघटनेत काम करण्याची संधी देण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post