‘संभाजी बिडी’व्दारे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर

‘संभाजी बिडी’व्दारे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर
बिडीचे नाव तातडीने बदलण्याची आ.रोहित पवार यांची मागणी

नगर : छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पुण्यात उत्पादन होणारी ही बिडी संभाजी बिडी या नावाने विक्री केली जाते. आता पवार यांनी बिडीला दिलेल्या संभाजी महाराज यांच्या नावाला आक्षेप घेतला आहे. आ.रोहित पवार यांनी कंगणा रणौत हिच्या मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला असून मुंबई, महाराष्ट्राबाबत चुकीचं बोलणं महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. आ.पवार यांनी आपल्या अधिकृत व्टिटर खात्यावरुन याबाबत मत मांडले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post