'भुतवडा' तलाव दोन वर्षानंतर प्रथमच ओव्हरफ्लो...VIDEO

 शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव दोन वर्षानंतर प्रथमच ओव्हरफ्लो 
 
जामखेड (नासीर पठाण): शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव व जोड तलाव दोन वर्षानंतर प्रथमच बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे शहर व चार वाड्यावस्तयांचा पाणी प्रश्न मिटला आहे. मागील दोन वर्षे तलाव कोरडाठाक पडल्याने आ. रोहीत पवार यांच्या बारामती अँग्रो, जैन संघटना आ. सुरेश धस यांच्यावतीने तलावातील गाळ काढल्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली आहे त्यामुळे शहराला आता दोन दिवसाआड पाणीपुरवठा होईल.
       शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला ११९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असलेला भुतवडा तलाव दोन वर्षानंतर प्रथमच भरला आहे. या तलावाशेजारी जोडतलाव असून त्याची क्षमता ४८ दशलक्ष घनफूट आहे.  या दोन्ही तलावात पाणी जाण्यासाठी एक चारी आहे त्यामुळे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जुना भुतवडा तलाव ओव्हरफ्लो होतो. आता दोन्ही तलाव भरल्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतीला आवर्तन सोडले जाणार आहे.
          २०१६ साली भुतवडा तलाव कोरडाठाक पडल्याने माजी आमदार सुरेश धस यांनी लोकसहभागातून गाळ काढला होता २०१७ साली तलाव पूर्ण क्षमतेने भरला त्यामुळे २०१८ साली पाऊस कमी झाल्याने भरला नाही त्यावेळी शहराला तीन महिने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता तर २०१९ मध्ये तीव्र दुष्काळामुळे तलावात नवीन पाणीच आले त्यामुळे नोव्हेंबर अखेर तलाव कोरडा पडला होता. तलाव कोरडा पडल्यामुळे भारतीय जैन संघटनेमार्फत भुतवडा तलावातील बराच गाळ काढण्यात आला याच वेळी बारामती ॲग्रो मार्फत आमदार रोहितदादा पवार यांनी पण गाळ काढला यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढली आहे. प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन केल्यास दोन वर्ष पाणीटंचाई शहराला भासणार नाही त्यामुळे जामखेडकरांसह लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
VIDEO 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post