भेंडा - कुकाणा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ताच झाला मैलबिगरी व्हिडिओ

 भेंडा - कुकाणा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ताच झाला मैलबिगरी व्हिडिओनेवासा तालुक्यातील भेंडा - कुकाणा रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी भेंडा येथील सामाजीक कार्यकर्ते रामदास वाघमारे यांनी स्वतःच खोरे - घमेले हाती घेऊन खड्डे बुजविली.

हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याचे असतानाही त्यांनी स्वतः मैलबिगरी होऊन खड्डे बुजविण्याचे केलेले हे काम कौतुकास्पद आहे .


प्रतिनिधी गणेश मुळे नेवासा -नेवासा ते शेवगाव हा महामार्ग सध्या खड्डयात गेलेला आहे.रस्त्यात मोठं मोठी खड्डे निर्माण झाल्याने नेमका कोणता खड्डया चुकवावा हेच वाहन चालकाला समजत नाही . अनेकदा खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात ही झालेले आहेत . असाच प्रकार भेंडा बस स्थानक चौक ते मळीनाला दरम्यान रस्त्यात अनेक मोठं मोठी खड्डे पडलेली आहे.सध्या पाऊस सुरू असल्याने या खड्ड्यांचे तळे झाली आहेत . खड्ड्यात पाणी साचलण्याने खड्डा किती मोठा आणि खोल आहे याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार त्या खड्ड्यात आढळून पडले आहेत .असाच प्रकार कारखाना प्रवेश व्दारा समोरील रस्त्यावर मोठं मोठी खड्डे पडलेली आहेत.हे खड्डे सार्वजनिक बांधकाम खात्याने 2 महिन्यांपूर्वी बुजविली होती.मात्र ती पून्हा उखडली . त्यामुळे वहातुकीला अडचण निर्माण होत होती.हे पाहून भेंडा येथील सामाजीक कार्यकर्ते रामदास वाघमारे यांनी स्वतःच खोरे - घमेले हाती घेऊन खड्डे बुजविली.तब्बल एक तास श्रमदान करून त्यांनी ही खड्डे बुजविली आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post