जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

 जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना अटकपूर्व जामीन मंजूरनगर : विनयभंग, खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात झावरे यांना सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात झावरे यांच्यावतीने ऍड.महेश तवले यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला.झावरे यांच्या विरोधात गुरुवारी पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकृती बिघडल्याने झावरे उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल झाले होते.


कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी सुजित झावरे गुरूवारी सकाळी तहसिल कार्यालयात गेले होते. त्यावेळी तहसिल कार्यालय पारनेर येथे तहसीलदार ज्योती देवरे, तलाठी, मंडळ अधिकारी व कार्यालयीन स्टाफ यांची मीटिंग चालू होती. तहसिलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्विकारावे अशी आंदोलकांची मागणी होती. देवरे यांची बैठक सुरूच राहिल्याने संतप्त झालेले झावरे तहसिलदारांच्या दालनात थेट घुसले. त्यावेळी केवळ पाच कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यासाठी दालनात यावे अशी भूमिका देवरे यानी मांडली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर तहसीलदार देवरे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post