राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी

 

राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या झाली कमीमुंबई, : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून २० हजार ४१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख १६ हजार ४५० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९४ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ६९ हजार ११९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post