पाईपलाईन फुटली, 'या' परिसरातील घरांमध्ये पाणीच पाणी...

वसंत टेकडी जवळील पाईपलाईन फुटली
संदेशनगर मधील घरा-दारात पाणीच पाणी...
नगरसेवक त्र्यंबके यांनी तातडीने लक्ष घातल्याने गळती बंद

     नगर - वसंत टेकडी येथील मुख्य पाईपलाईनला शनिवारी मध्यरात्री गळती लागल्याने रविवारी पहाटेपर्यंत जवळच असलेल्या संदेशनगर वसाहतीत अक्षरशघरा-दरांत पाणीच पाणी साचले अनेकांना मध्यरात्री पाऊस झाला असावा व हे पाणी आले असे वाटले.
     रविवारी सकाळी टाकीजवळच राहणार्या नागरिकांनी पाणी कोठून येते हे शोधत असतांनाच मुख्य पाईपलाईन फुटल्याचे दिसलेतातडीने या वसाहतीत राहणारे नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी तातडीने लक्ष घातलेवसंत टेकडी येथे जाऊन श्री.त्र्यंबके यांनी मुख्य पाईपलाईनची पाहणी करुन मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे निदर्शनास आलेआयुक्त श्रीकांत मायकलवार यांना माहिती दिलीत्यांनी संबंधितांना सूचना करुन पाणी उपसा बंद करण्यास सांगितल्यानंतर गळती थांबली.
     शनिवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास पाईपलाईन फुटली रविवारी सकाळी पाणी बंद  होईपर्यंत संदेशनगरमधील नागरिकांच्या घरात-दारात पाण्याचे तळे साचलेनगरसेवक त्र्यंबके यांनी घरातून पाणी काढण्यासाठी स्वतनागरिकांना मदत केलीतातडीने लक्ष घातल्याने पाणी बंद करता आलेदुपारपर्यंत दुरुस्ती होऊन पूर्ववत पाणी उपसा सुरु झाल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post