करोनाच्या संकटकाळात 'या' कंपनीच्या कामगारांना वेतनवाढीचे गिफ्ट

स्वराज्य कामगार संघटना व ममता ऑफसेटमध्ये ३ वर्षांचा कामगार करार 
ममता ऑफसेटमधील कामगारांना १५ टक्के वाढ : योगेश गलांडे
स्वराज्य कामगार संघटना व केडगाव इंडस्ट्रियलमधील ममता ऑफसेट कंपनीमध्ये ३ वर्षांकरिता कामगार करार संपन्न होऊन देवान-घेवाण करताना संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे व कंपनीचे संचालक अरुण झंवर. समवेत जनरल सेक्रेटरी आकाश दंडवते, कामगार प्रतिनिधी विष्णू लवांडे, भाऊसाहेब जाधव, विठ्ठल सागर, तुकाराम गायकवाड, भीमा जपकर आदी उपस्थित होते. (छाया : लहू दळवी)
नगर : कोरोना संसर्ग विषाणूच्या प्रादर्भावमुळे देशामध्ये उद्योग व कारखान्यांवर मोठा परिणाम झाल्यामुळे कामगारांवरही एक आर्थिक संकट कोसळले आहे. कारखानदारांनी उत्पादत केलेला माल बाजार पेठेत मागणी नसल्यामुळे अनेक कारखाने बंद आहेत. या संकटकाळात स्वराज्य कामगार संघटनेने कामगारांचे हित जोपाण्यासाठी कामगार कायद्याप्रमाणे कामगारांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, स्वराज्य कामगार संघटनेने एमआयडीसीमध्ये अनेक कामगारांना कायमसेवेत केले. केडगाव इंडस्ट्रियलमधील कंपनीतीली कामगारांचा ३ वर्षाकरिता कामगार करार संपन्न झाला. या कामगार करारामध्ये कामगार कायद्याप्रमाणे हक्क मिळवून दिला. तसेच कामगारांना १५ टक्के वाढ या करारामध्ये करण्यात आला. स्वराज्य कामगार संघटना ए.एन.१७७१-२0१३ या संघटनेने कामगारांचे हित जोपासण्याचे काम गेल्या ७-८ वर्षापासून करत असल्याचे प्रतिपादन संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी केले.

स्वराज्य कामगार संघटना व केडगाव इंडस्ट्रियलमधील ममता ऑफसेट कंपनीमध्ये ३ वर्षांकरिता कामगार करार संपन्न होऊन देवान-घेवाण करताना संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे व कंपनीचे संचालक अरुण झंवर. समवेत जनरल सेक्रेटरी आकाश दंडवते, कामगार प्रतिनिधी विष्णू लवांडे, भाऊसाहेब जाधव, विठ्ठल सागर, तुकाराम गायकवाड, भीमा जपकर आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post