...तर नगरमध्ये शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल


...तर नगरमध्ये शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल
 शिवसेना पदाधिकार्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र


अहमदनगर : दिवंगत नेते अनिल राठोड यांनी कधी जातीचे राजकारण केले नाही, पण आता अहमदनगर शहरात जातीचे राजकारण सुरु झाले आहे, आपण यात लक्ष घालावे, अन्यथा शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती व्यक्त करणार पत्र अहमदनगरमधील शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. अहमदनगरमधील सावेडीचे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत सुर्यभान शेळके यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून स्थानिक राजकारणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
अहमदनगरमध्ये गुरुवारी स्वीकृत नगरसेवक निवड आहे. शिवसेनेत आजपर्यंत मा. स्व. अनिल भैय्या राठोड यांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही. म्हणून अहमदनगरमध्ये शिवसेना संघटना बळकट राहिली. परंतु काही दिवसापासून जातीचे राजकारण करुन अनिल भैय्या राठोड यांना पराभूत केले होते. आजही स्वीकृत नगरसेवक भरतीवेळी जातीचे राजकारण करुन दोन्ही उमेदवार एकाच जातीचे दिले आहेत. तरी आपण यात लक्ष घालावे, अन्यथा शिवसेनेला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post