'या' भागात रहिवाशांनी लोकवर्गणी जमा करून केली रस्त्याची दुरुस्ती, दिमाखात लावला फलक


'या' भागात रहिवाशांनी लोकवर्गणी जमा करून केली रस्त्याची दुरुस्ती, दिमाखात लावला फलक

नियमित कर भरूनही सोयीसुविधांसाठी केली पदरमोड


नगर (सचिन कलमदाणे ):  सार्वजनिक रस्त्यांची दुरवस्था नगर शहरासाठी नवीन नाही. खड्डेमुक्त रस्ता शोधूनही सापडणार नाही.  नगर- कल्याण रोडवरील विद्या कॉलनी, सुयोग पार्क भागात रस्त्याची अशीच दुरवस्था झाल्यावर येथील रहिवाशांनी रस्ता दुरुस्तीसाठी मनपाची वाट न पाहता स्वतःच लोकवर्गणी जमा करून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली. सध्या पावसाळ्यात खराब रस्त्यामुळे येजा करताना खूप त्रास सहन करावा लागत होता. रस्ता खराब झालेला दिसत असूनही मनपाची यंत्रणा दखल घेत नव्हती. त्यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी लोकवर्गणी जमा करून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली.  जवळपास 40 हजार रुपयांचे काम करून येथील रहिवाशांनी रस्त्याचा प्रश्न सोडवला.
नियमित टॅक्स भरत असूनही रस्त्याची दुरुस्तीचे काम मनपाकडून होत नसल्याने नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.  पण एवढ्यावरच न थांबता स्वतःच्या पैशातून रस्ता व्यवस्थित करून घेतला. 500 ते 700 कोटींचे बजेट असलेल्या महानगरपालिकेसाठी ही मोठी लाजिरवाणी गोष्ट ठरावी, असेच अंजन या परिसरातील नागरिकांनी मनपाच्या बंद डोळ्यात घातलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post