वहिनी...तुम्ही संघर्ष योद्धा आहात..लढाई जिंकणारच

वहिनी...तुम्ही संघर्ष योद्धा आहात..लढाई जिंकणारच
आ.मोनिका राजळे यांच्या चांगल्या आरोग्यासाठी जनतेच्या शुभेच्छा

नगर - शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आ.मोनिका राजळे करोनाबाधित असल्याचे समोर आले आहे.  आ.राजळे यांची प्रकृती स्थिर असून त्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. आ.राजळे करोनाबाधित असल्याचे समजल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियाद्वारे आपल्या वहिनींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

"या कोरोनापेक्षाही तुम्ही आजवर केलेला संघर्ष फार मोठा आहे.म्हणुनच शेवगाव-पाथर्डीची जनता आपणास संघर्ष योद्धा म्हणते. ते उगीच नाही.
आपल्या संघर्षाला मानवंदना देत परमेश्वराला एकच मागणं मागतो, ह्या जनतेच्या "आईला" लवकर बर कर.कारण हजारो गोरगरीब, पिछडलेल्या आडले नडलेल्यांची ही "माई" आहे..

#वहिनी_हि_लढाई_आपण_जिंकणारच

अशा शुभेच्छा समर्थकांकडून दिल्या जात आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post