करोनायोद्धा मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

नगर जल्लोषच्यावतीने मनपा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार
सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात केलेले काम कौतुकास्पद : धनंजय जाधव
 अहमदनगर मनपाचे तोफखाना भागातील सफाई कर्मचाऱ्यांचा नगर जल्लोषच्यावतीने सत्कार करुन सन्मानचिन्ह देताना माजी नगरसेवक अँड. धनंजय जाधव. समवेत अध्यक्ष सागर बोगा, सागर सुरपुरे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, राजेंद्र सामल, राजू पठाडे, संतोष वैरागर, गोरख भालेराव व सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (छाया : लहू दळवी)

नगर : सामाजिक जाणिवेतून संत गाडगेबाबा यांना स्वच्छतेची मशाल हाती घेऊन शहर व गावोगावी जाऊन हातात झाडू घेऊन स्वच्छता करीत असे व समाजामध्ये जनजागृती करत होते. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, म्हणून कीर्तनाद्वारे सांगत असे. समाजाचे आरोग्य अबाधित राहण्याचे काम आता मनपा सफाई कर्मचारी दररोज पहाटे कुठलाही खंड न पडता करत आहेत. तोफखाना परिसरातील सफाई कर्मचारी कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये कॅन्टोन्मेंट झोन असतानाही आपल्या आरोग्याची पर्वा न करता नागरिकांना धीर देत प्रभागातील स्वच्छता करीत होते. कोरोनाच्या काळामध्ये नागरिक भयभीत झाला आहे. परंतु आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, हाच त्यांचा उद्देश आहे. नगर जल्लोषने मनपा सफाई कर्मचाऱ्यांची सामाजिक भावनेतून त्यांचा सत्कार करून सन्मानपत्र देण्याचा उपक्रम उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मा. नगरसेवक अँड. धनंजय जाधव यांनी केले.

अहमदनगर मनपाचे तोफखाना भागातील सफाई कर्मचाऱ्यांचा नगर जल्लोषच्यावतीने सत्कार करुन सन्मानचिन्ह देताना मा. नगरसेवक अँड. धनंजय जाधव. समवेत अध्यक्ष सागर बोगा, सागर सुरपुरे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, राजेंद्र सामल, राजू पठाडे, संतोष वैरागर, गोरख भालेराव व सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post