नगर जिल्ह्यासाठी रेमेडिसीवरचा मुबलक साठा मिळावा


नगर जिल्ह्यासाठी रेमेडिसीवरचा मुबलक साठा मिळावा, आ.संग्राम जगताप यांची आरोग्य मंत्री राजेश टोपेंकडे मागणी


नगर: नगर जिल्ह्यात करोना रूग्ण वाढत असताना रूग्णांवरील उपचारासाठी रेमेडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. नगर जिल्हा रुग्णालयात रेमेडिसीवरचा साठा संपला असून खाजगी रुग्णालयातही रेमेडिसीवर मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर आ.संग्राम जगताप यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन नगर जिल्ह्यासाठी रेमेडिसीवरचा पुरेसा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले.
आ.जगताप यांनी माहिती देताना सांगितले की,
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेतली.यावेळी जिल्हा रुग्णालयातील रेमेडिसीवर इंजेक्शनचा साठा, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माहितीनुसार संपला असल्याचे अधोरेखित करून, खाजगी रुग्णालयांमध्ये देखील हा तुटवडा जाणवत असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवणाऱ्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले हे रेमेडिसीवर इंजेक्शन नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांच्याकडे मागणी केली. सदरचे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांचा जीव या इंजेक्शन अभावी धोक्यात आला आहे.त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत जास्तीत जास्त इंजेक्शनचा साठा उपलब्ध करुन देण्याची विनंती आरोग्यमंत्री राजेश जी टोपे यांच्याकडे करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post